धरणगाव प्रतिनिधी । पी.आर.हायस्कूलचे शिक्षक स्व.शरदकुमार बन्सी आणि पी.आर.हायस्कूल सोसायटीचे दिवंगत संचालक स्व.अप्पासाहेब पंडितराव हुना बडगुजर, स्व. पुरूषोत्तमसा मकवाने यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे.
धरणगावचे भूषण, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील जनप्रिय, विद्यार्थीप्रिय व शिक्षकप्रिय म्हणून सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय शरदकुमार बन्सी आणि पी.आर.हायस्कूल सोसायटीचे दिवंगत संचालक स्वर्गीय अप्पासाहेब पंडितराव हुना बडगुजर, स्वर्गीय पुरूषोत्तमसा मकवाने यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. यांना धरणगावातील सर्व सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांकडून श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम आज दि.१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५:३० ला पी. आर. हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.