धरणगाव (प्रतिनिधी) : पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी ताराबाई चाळसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे येथील अरविंद गंभीर यांनी शाळेला दिलेल्या रकमेतून एका विद्यार्थिनीला दत्तक घेऊन वर्षभराचे शालेय साहित्य आणि ५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे हे उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या शिष्यवृत्ती म्हणजे गरीब, गरजू, हुशार व होतकरू मुलींसाठी यशवंत होण्यासाठी साहाय्यभूत ठरणार असल्याचे सांगितले. त्यांनी आणि पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक बी.डी. शिरसाठ आणि उमाकांत बोरसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. लक्ष्मी निवृत्ती पाटील या विद्यार्थिनीला वर्षभरातील शालेय साहित्य, गणवेश देण्यात आला. डॉ. मिलिंद डहाळे आणि डॉ. अरुण कुलकर्णी यांनी अरविंद गंभीर यांच्या औदार्याचा गौरव केला.
सूत्रसंचालन एनसीसी मेजर डी.एस. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आशा शिरसाठ यांनी केले. यशस्वीतेसाठी मिलिंद हिंगोणेकर आणि जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेत आहे.