पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक दोनमध्ये चक्क १० दिवसानंतर नळाला पाणी आले, तेही घाणेरडं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहेत.
पहुर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक दोनमध्ये गेल्या १० दिवसापासून नळांना पाणी आले नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत होती. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता डि.पी. जळाल्याचे सांगण्यात आले तर नंतर मोटार जळाल्याचे सांगण्यात आले. १० दिवस उलटल्यानंतर ११ व्या दिवशी नळांना पाणी आले मात्र तेही घाणेरडं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहेत.
जलशुद्धीकरण केंद्र नावालाच
पहुर – शेंदुर्णी रोडवर मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मात्र ते बंद पडलेय. गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी हे जलशुद्धीकरण केंद्र का सुरू केले जात नाहीत ?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहेत. पहुर कसबे गावात शुद्ध पाणीपुरवठा करा अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. तसेच गावातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
















