TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

vijay waghmare by vijay waghmare
October 22, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले होते. यामध्ये प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीप प्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व सचिव अरविंद देशपांडे तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी अरविंद देशपांडे व शरदचंद्र छापेकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा नाईक गोडबोले हिने केले. आणि सुरू झाला १८८२ सालापासूनचा संगीत नाटकातील नाट्यपदांचा प्रवास.
कार्यक्रमाची सुरुवात “पंचतुंड नर रुंड माल धर” या नांदीने झाली. संगीत मानापमान नाटकातील अत्यंत गाजलेले पद “चंद्रिका ही जणू”, हे नाट्यपद अत्यंत उत्तम रित्या सादर झाले ते त्यामधील बारकाव्यां सकट. संत कान्होपात्रा नाटकातील “पतीत तू पावना” हे पद सादर केले. रणदुंदुभी नाटकातील “दिव्य स्वातंत्र्य रवी” हे पद सादर केले.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

देव दिना घरी धावला नाटकातील “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी” हे पद त्याच्या भावार्थासह सादर केले. सं. मत्स्यगंधा नाटकातील जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेले “गुंतता हृदय हे” या नाट्यपदाने रसिकांना अक्षरशः खिळविले. त्यानंतर सं. कट्यार काळजात घुसली नाटकातील “तेजोनिधी लोह गोल ! भास्कर हे गनन राज” व “सुरत पिया की छिन् बिसुराये” ह्या पदाने तर रसिकांना मंत्रमुग्ध केले. “सर्वात्मका सर्वेश्वरा” या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे दोन तास सुरू असलेली ही सुरेल मैफल केव्हा संपली हे रसिकांच्या लक्षातही आले नाही. जळगाव शहराचे आमदार माननीय श्री राजू मामा भोळे यांनीही या मैफलीचा आस्वाद घेतला. अनेक मान्यवरांसह जळगाव शहरातील तमाम रसिक वर्ग या मैफिलीने मंत्रमुग्ध झाला. या मैफिलिस कै. नथ्थुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले. पाडवा पहाट कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्निग्धा कुलकर्णी, प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरूण नेवे, वरूण देशपांडे, अनघा नाईक गोडबोले, इ. नी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 एप्रिल 2026 !

April 27, 2026

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026

PF मधील पैसे कधी काढू शकता ? ; जाणून घ्या.. एका क्‍लिकवर

December 26, 2021

परिवहन मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटिव्ह

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group