चोपडा (प्रतिनिधी) येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्च कला परीक्षा 2023 चा ए.टी.डी. द्वितीय वर्ष वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला. भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र चोपडा,ए.टी.डी. द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शासकीय उच्च कला परीक्षेत कु. नम्रता गोपाल अग्रवाल ही प्रथम क्रमांकाने तर कु. कांचन पांडुरंग कोळी (भुसावल) ही द्वितीय क्रमांकाने आणि शिवम बाळकृष्ण सैंदाणे (जळगाव) हा तृतीय क्रमांकाने पास झाला. संस्थेच्या अध्यक्षा पूनमताई गुजराथी व सहसचिव अश्विनीबेन गुजराथी, उपप्राचार्य डाॅ.आशिष सुभाषलाल गुजराथी आणि सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. तर पुढील वर्षात तत्काळ प्रवेश घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, प्रा. संजय नेवे व माजी प्राचार्य राजेंद्र महाजन आणि प्रा. जी व्ही साळी आणि भगवान बारी, अतुल अडावदकर व प्रवीण मानकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.