धरणगाव ता. पाळधी (प्रतिनिधी) येथील मेन रोडवरील एका किराणा दुकाना मागील घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे.
या संदर्भात बबिता नंदलाल झंवर यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या किराणा दुकाना मागील घरातून दि. २ जुलै ते २५ सप्टेंबरच्या दरम्यान त्यांच्या आई व आजोबांचे २४ हजाराची सोन्याची दागिणे आणि १५ हजार रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.