धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडातर्फे संत शिरोमणी सांवता महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
समाज मंदीरात संत सांवता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. यांनतर सायंकाळी महाराजांची पालखी मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणुक समाज मंदीरा पासुन लहान माळी वाडा परिसरातुन तेली तलावाचा बाजुस असलेल्या सिध्दी हनुमान मंदीरा जवळ समारोप करण्यात आला.
याप्रसंगी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, कुणबी समजाध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, विलास महाजन जेष्ठ पत्रकार कडू महाजन, सचिव पुंडलिक महाजन, राजेंद्र महाजन, गुलाब बळीराम महाजन, दिलीप महाजन, रघुनाथ महाजन, दिपक महाजन, हर्षल महाजन, श्रीराम महाजन, धिरज महाजन, चेतन महाजन, विजय महाजन, शांताराम महाजन, आनंदराज पाटील, गणेश बापु पाटील, भैय्या पाटील, जितेंद्र महाराज पाटील, पंकज पाटील यासह माळी, कुणबी, तेली, मराठे समाजाचे पंचमंडळासह समाज बांधव उपस्थित होते.