यावल : जळगाव जिल्ह्यातील – रावेर आणि यावल पट्टयात व सततच्या ढगाळ हवामानामुळे केळीवर सीएमव्ही (कुंकु वर मोझाक व्हायरस) रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. या बाधित केळी पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी संबंधित कृषीमंत्री यांच्याकडे केली आहे.
यावल व रावेर परिसरात केळी पिकावर सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात रावेर यावल तालुक्यात सिएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी रोपे उपटून नष्ट केल्याचे दिसून येते. त्यामुळे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तसेच सीएमव्ही रोगाचा समावेश केळी पिक विम्यात करावा, अशी विनंती भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना केली आहे. या मागणीबाबत रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.