जळगाव (प्रतिनिधी) इक़रा एज्युकेशन सोसायटी संचलित जळगाव शहरातील बी एम जैन प्री-प्रायमरी व प्रायमरी शाळेतील एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी तसेच इक़रा उर्दू हायस्कूल सालार नगर मधील एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांना अनुक्रमे मुख्याध्यापक शेख आबिद बुढण व दुसरे मुख्याध्यापक डॉक्टर शेख हरून बशीर यांनी या चारही विद्यार्थ्यांना त्यांचे पालक सर्वश्री शेख नूरुद्दीन अब्दुल गफार व त्यांचे बंधू शेख सादिक अब्दुल गफार यांना ४ जून रोजी पत्र व त्यासोबत दोघांचे शाळा सोडल्याचे दाखले पोस्टने घरी पाठवून दिले.
दाखले सोबत पत्र
आपल्या पाल्यांचे दाखले शाळेतून काढण्यात आले असून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा असे पत्र दिले.
विद्यार्थ्यांना काढण्या मागचा हेतू
दोघी मुख्याध्यापकांनी दोघी पालकांना पत्र दिले असून त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की शेख सादिक गफ्फार हे बी एम जैन प्रायमरी ला शिक्षक असून त्यांनी त्यांच्या सीनियरटी साठी व त्यांच्या पगाराच्या फरकसाठी उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्याने त्यांची दोघी मुले शाळेतून काढण्यात येत आहे. तसेच शेख सादिक गफार यांचे बंधू नुरुद्दीन शेख कासोदा येथे उर्दू शाळेत मुख्याध्यापक आहे. ते आपल्या बंधूंना नेहमी मार्गदर्शन व सहकार्य करतात एवढेच नव्हे तर यांच्या विभागीय चौकशी मध्ये त्यांना सहकार्य करतात म्हणून त्यांच्या दोघी मुली यांना शाळेतून काढण्यात येत आहे असे पत्र दिले.
शाळा व विद्यार्थीची नावे
बी एम जैन मधील विद्यार्थी विद्यार्थिनी नावे सिद्दिका शेख इयत्ता ४ थी व मोहम्मद फ़ैज़ मोहम्मद सादिक इयत्ता ४थी, तसेच इकरा उर्दू हायस्कूल मधील रिमशा फातेमा इयत्ता ९ वी मधील विद्यार्थ्यांनी व सुफियान मोहम्मद सादिक इयत्ता ७ वी या चार ही विद्यार्थ्यांना शाळेतून प्रिकॉशनरी स्टेप ड्यु टू पेरेंट्स हे कारण दाखवून काढल्याचे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नमूद केलेले आहे.
शिक्षणाधिकारी कडे तक्रार व आदेश
सदर प्रकरणी शिक्षण अधिकारी यांच्याकडे शेख नूरुद्दीन व शेख सादिक यांनी रीतसर तक्रार केली असता शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक यांना पत्र क्रमांक ३४८ दिनांक १० जून २२ रोजी कळविले की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १६ मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे कोणत्याही बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याशिवाय शाळेतून निष्कासित करता येत नाही अशी तरतूद आहे तरी आपण विद्यार्थ्यांचा रद्द केलेला प्रवेश पुन्हा देण्यात यावा व केलेल्या कारवाईचा अहवाल त्वरित सादर करावा असे पत्र दिले
पहिल्या दिवशी मुले घरी परत आली
शिक्षण अधिकारी यांनी पत्र देऊन सुद्धा आज १५ जून रोजी या चारही विद्यार्थ्यांना शाळेत येऊ दिले नाही. सदर बाब पालकांनी बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांना सांगून सहकार्याची विनती केली.
मनियार बिरादरी अध्यक्ष विद्यार्थी व पालक थेट दंडाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या दालनात
१५ जून शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस व हे चारी विद्यार्थी शाळेमधून परत आल्याने त्यांचे पालकांनी तोह फोडला असता मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी याप्रकरणी स्वतः तक्रारदार होऊन माननीय जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव यांना रीतसर तक्रार सादर केली की भारतीय राज्यघटनेमध्ये बालकांसाठी संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे केलेले आहे आणि संयुक्त राष्ट्र संघटनेवर बाल हक्क जाहीरनाम्यावर भारत देशाने सुद्धा स्वाक्षरी केली आहे म्हणून भारतातल्या बाल हक्काच्या अत्याचार प्रकरणी विविध कायदे अस्तित्वात आलेले आहेत. त्यात प्रामुख्याने पोक्सो कायदा ,राईट ऑफ चीलद्रेन फ्री अंड कंपल्सरी एज्युकेशन अॅक्ट 2009, बेटी बचाव बेटी पढाव अभियान 2015, जुवेनाईल जस्टीस केअर अंड प्रोटेक्शन ऑफ चीलद्रेन अॅक्ट 2015 व भारतीय दंड विधान कायदा अस्तित्वात आहे. असे असतांना त्याची पायमल्ली केली जात असल्याने या दोघी मुख्याध्यापकांना व संस्था अध्यक्ष यांना या कायद्याचा भंग केलेला असल्यामुळे त्यांच्यावर त्वरित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी व विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये म्हणून त्यांना शाळेत प्रवेश द्यावा व त्यांच्या शिक्षणाची हमी घेण्यात यावी अशी तक्रार दाखल केलेली आहे.
दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची सहानुभूती विद्यार्थ्यांसोबत
अप्पर जिल्हा अधिकारी प्रवीण महाजन व पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी या लहान बालकांना बघून व त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला प्रत्यक्ष ऐकून विद्यार्थी, पालक व बिरादरी ला स्पष्टपणे सांगितले की आम्हास विद्यार्थ्यां बाबत सहानुभूती असून त्यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी योग्य ती शिक्षण विभागामार्फत कारवाई करू असे आश्वासन दिलेले आहे.
न्यायालयात जाणार- फारूक शेख
मुख्याध्यापक व संस्था अध्यक्षांवर कारवाई न झाल्यास जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख हे न्यायालयात जाण्यात साठी कायदे तज्ञांशी सल्लामसलत करीत असल्याचे त्यांनी पत्र का द्वारे कळवले आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक व खास करून महिला तसेच बिरादरीचे हरीश सय्यद, एडवोकेट आमिर शेख, अख्तर शेख ,अल्ताफ शेख पालकांच्य वतीने सत्तार शेख, नुरुद्दीन शेख, सादिक शेख आदींची उपस्थिती होती.