चोपडा (प्रतिनिधी) दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी पंकज विद्यालयात उच्च प्राथमिक विभागाची पालक सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी युवराज प्रधान कोळी होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील सर उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून इशस्तवनाने सभेची सुरुवात झाली. योगेश चौधरी यांनी शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी पालकांना थोडक्यात उद्बोधन केले. तर सी. आर. चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परिक्षेत व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवीलेल्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
या सभेत मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वेळेचे नियोजन पालकांनी कसे करावे? विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना योगासने, खेळ व मनोरंजनासाठी वेळ कसा काढावा? याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. विविध विषयांवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनश्री जावळे व मयूर पाटील यांनी संयुक्तिक केले. सर्व उपस्थित पालकांचे आभार स्वप्निल ठाकूर यांनी मानले. सभा यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल महाजन, सचिन लोखंडे, प्राची कोळी, प्रियंका पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.