TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा : वहिनीचं वैधव्य केलं दूर, भावाच्या मृत्यूनंतर मुलांसाठी वहिनीशी लग्न ; सर्व स्तरातून तरुणाचं कौतुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2023
in पारोळा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने भाऊचे निधन झाल्यानंतर आपल्या विधवा भावजयसोबत विवाह करणारा तरुण सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील दिर आणि भावजयचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. राहुल विनोद काटे (वय-३१) असं या दिराचं नाव असून त्याने अनिता काटे (वय-२८) या विधवा वहिनीसोबत लग्नाची रेशीमगाठ बांधली आहे. राहुलने घेतलेल्या निर्णयाचं समाजातील सर्व स्थरातून कौतुक होतंय.

लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती नियतीने हिरावली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरा, समाजाच्या मानसिकतेला फाटा देत काटे कुटुंबियांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर म्हणजे दीर राहुल सोबत लावून दिले आहे. गेल्या वर्षी कुटुंबाचा आधारवड असलेला युवा शेतकरी संभाजी काटे याचे हृदयविकाराने निधन झाले. ज्यावेळी संभाजीचे निधन झाले त्याच्या पश्चात विद्या व वैभवी या जुळ्या मुली तर पत्नी अनिता या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. जन्म होण्यापूर्वीच बाळाच्या पित्याला क्रूर काळाने हिरावून नेले होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

या कठीण काळात लहान दीर राहुलने परिवाराला धीर दिला. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी अनिता यांनी ‘मयंक’ या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कमी वयात विधवा झालेल्या वहिनीचे आणि भाऊच्या लहान मुलांचं दु:ख राहुलकडून पाहवत नव्हतं. त्यामुळे त्याने वहिनीसोबत लग्नगाठ बांधून तिला व तिच्या मुलांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले. कुटुंबियांनी होकार दर्शविल्यानंतर राहुल व त्याची विधवा वहिनी यांचा विवाह मंगळवारी कोळपिंप्री गावातील भवानी मंदिरात नातेवाईकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वऱ्हाडी मंडळींनीही मोठ्या दिलाने या अनोख्या विवाह सोहळ्याचे स्वागत केले आणि नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
Next Post

खळबळजनक : बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला चिखली येथील विहिरीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 7 ते 13 डिसेंबर 2025 !

December 7, 2025

चंद्रपुरात सापडलेली गोलाकार वस्तूचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन ; जाणून घ्या..सविस्तर !

April 4, 2022

लडाखमधील दुर्घटनेत साताऱ्यातील जवान शहीद !

August 21, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १९ ऑक्टोबर २०२२ !

October 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group