धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथील मागासवर्गीय मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला विष पाजल्यानंतर तिचा धुळे हिरे मेडिकलमध्ये उपचारा दरम्यान, दुर्दैवी मृत्यू झाला. या पिडीत मुलीला न्याय मिळवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आज फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.
या प्रकरणातील दोषींना तात्काळ शिक्षा करुन पीडितेला त्वरीत न्याय देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी व चर्मकार समाजाचा वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात एक निवेदन आज तहसीलदार तथा पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, या घटनेचा आम्ही शिवसेना व चर्मकार समाजाचा वतीने जाहीर निषेध करतो. ही घटना अतिशय हृदयद्रावक असून मनाला चटका देणारी आहे. मागासवर्गीय व महिला जातीसाठी हे अतिशय घातक आहे. लवकरात लवकर मारेकऱ्यांना अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. वरील घटनेसंदर्भात सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, आर.डी.महाले यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. फास्टट्रॅक कोर्टात केस चालवावी व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना व चर्मकार महासंघाचा वतीने तहसिलदार नितीनकुमार देवरे साहेब , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, नगराध्यक्षा तथा महात्मा फुले बिग्रेडचा महिला जिल्हाध्यक्ष उषाताई वाघ, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, शिवसेना शहर प्रमुख ताथा नगरसेवक राजेंद्र महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, गुलाब मराठे, सुरेश महाजन, विलास महाजन, अहेमद पठाण, महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाबाई धनगर, सुनीता लिडायत, रेखा लिडायत, कल्पना लिडायत, भारती चौधरी, विभाग प्रमुख संजय चौधरी, उपनगराध्यक्ष करण वाघरे, विलास पवार, अरविद चौधरी, गोलू चौधरी, विनोद चव्हाण, वाल्मिक पाटील राहुल रोकडे व महिला पदाधिकारी व चर्मकार महासंघाचे समाज बांधव उपस्थित होते.