पारोळा (प्रतिनिधी) एका उमेदवाराचे बनावट कागदपत्रे व आधारकार्ड बनवून ती कार्यालयात दाखवून माघार घेतल्याची घटना घडलीय. याप्रकरणी उमेदवाराची व शासनाची फसवणूक केली म्हणून पारोळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात योगेश बाबुराव पाटील (वय ५०, रा. इंदिरागांधी गार्डन श्रेयस कॉलनी ता. जि. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास योगेश पाटील यांच्या समक्ष कार्यालयात माघार घेणारे उमेदवार जोरसिंग हरसिंग वंजारी व त्यांच्या सोबत असलेले पनलचे सर्व उमेदवार तसेच पॅनल प्रमुख असे आले. त्यांनी योगेश यांना सांगितले की, काल माघार घेण्यास आलेले कौतिक दामू पाटील (रा. महिंदळे ता. भडगाव) व एक इसम वय सुमारे ६० ते ६२ वर्ष हे बनावट असुन त्यांनी दिलेले कागपत्र हे खोटे आहेत असे कळविले. सदर उमेदवारांची पुन्हा खात्री केली असता उमेदवार जोरसिंग हरचंद वंजारी हे समक्ष सही करणारे आहेत व सदर नोटीसवर त्याच्या नावाने अगठा डगवणयात आलेला आहे. तसेच सदर उमेदवार योगेश पाटील यांच्या समक्ष हजर असून त्यांने माघार घेणेबाबत कुठलीही नोटीस दिली नाही. काल योगेश पाटील यांच्यासमोर आलेले दोन्ही इसम हे बनावट असून त्यांनी सादर केलेले कागदपत्र नोटीस त्यांचे आधार कार्ड हे कोठून तरी तयार करुन ते खोटे असूनही ते खरे असल्याचे बतावणी करुन त्याचा वापर करुन योगेश पाटील यांची शासनाची फसवणुक केली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रविद्र बागुल हे करीत आहेत.