साकळी ता. यावल (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कार्यालयात पवन युवराज पाटील यांची युवक तालुका उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र युवक राष्ट्रवादी अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील व जिल्ह्य बँकेचे माजी संचालक व खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक प्रशांत चौधरी यांचे हस्ते देण्यात आले.
पवन पाटील यांनी राष्ट्रवादी विध्यार्थी अध्यक्ष म्हणून आधी काम केलेले आणि विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आहेत यांचीच दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली . या प्रसंगी यावल युवक राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष हितेश गजरे , युवक समन्वयक किशोर माळी , विक्की पाटील आदी उपस्थित होते .
पवन पाटील यांच्या निवडी बद्दल त्यांचे तालुक्यातून तालुका अध्यक्ष मुकेश येवले , प्रदेश सदस्य सीताराम पाटील , दिनकर पाटील , विधान सभा क्षेत्र प्रमुख अनिल नाना , माजी नगराध्यक्ष शशांक दादा देशपांडे , शशिकांत पाटील , विनोद पाटील , किशोर पाटील ,गुणवंत निळं , प्रशांत पाटील , दीपक पाटील , नरेंद्र शिंदे , पवन खरें ,विरावली चे गुलाब पाटील रणधीर पाटील (ग्रामपंचायत सदस्य) , गिरीष पाटील , भूषण पाटील ,दिलीप निळे ,नथु पाटील,दगडू तडवी राजेश अडकमोल ,प्रकाश पाटील ,आदींनी शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे .