नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलन हे आता डावे आणि माओवाद्यांच्या हाती गेले असल्याचा गंभीर आरोप रेल्वे मंत्री तसंच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला आहेत.
शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री तसंच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा दावा पीयूष गोयल यांनी केला आहे. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करू नये, अशी विनंतीही गोयल यांनी केली. डाव्या विचारसरणीच्या संघटना आपला अजेंडा चालू इच्छित आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि सरकार सोबत चर्चा करावी. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या दरवाजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी खुले असल्याचे गोयल म्हणाले. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत. वामपंथी संघटना शेतकऱ्यांना भडकवत आहेत. सरकार तिन्ही कृषी कायदे मागे घेणार का, या प्रश्नावर गोयल म्हणाले की, या कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. काही मोजक्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची नुकसान करता येणार नाही. शेतकरी कायद्याच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करू इच्छित असतील तर त्यांनी सरकारकडे यावं. सरकार यासाठी तयार आहे. जीत पर्यंत एमएसपीचा प्रश्न आहे, लोकसभेचे पासून सरकार पर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण आश्वासन दिले आहे की एमएसपी मागे घेतला जाणार नाही. एमएसपी सुरूच राहणार आहे. यंदा ते २३ टक्के जास्त शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात आली. मला पूर्ण विश्वास आहे की, शेतकरी देश हिताच्या या कायद्याला समजून घेतील.