धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील हॉटेल गोविंद जवळ एका पायी जाणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात हैदरअली वीरजू अली (वय ३१ रा. कोकलमऊ पोस्ट करियाव ता.जि. संत रविदास नगर भदोही (राज्य उत्तर प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ एप्रिल २०२२ रोजी हैदरअली याचा पुतण्या सलमान अली हबीब अली (वय २० रा. कोकलमऊ पोस्ट करियाव ता.जि. संत रविदास नगर भदोही (राज्य उत्तर प्रदेश) हा पुणे येथून गावी येत असताना भुसावळ रेल्वे स्थानक येथून हरविला. त्यानंतर तो पाळधी गावाकडे पायी जात असताना हॉटेल गोविंद जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर त्याला अज्ञात वाहनाने मागून ठोस मारली. यात सलमान अली याचा गंभीर जखमी होत मृत्यु झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव हे करीत आहेत.