TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत-पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
September 26, 2025
in जळगाव, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी – जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण करावीत,असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला आमदार चंद्रकांत सोनवणे,आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील,आमदार अमोल जावळे आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मंजूर कामांना महावितरण कडून गती मिळणे आवश्यक असून यासाठी संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार असून,सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाणार आहे.

पीएम किसान योजनेची प्रकरणे निकाली काढून,सौर ऊर्जा प्रकल्प, पीएम-कुसुम व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, गतीने राबवून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, नादुरुस्त रोहित्रे व विजेच्या खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा नियमीत करावा, असे निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून पारदर्शक बिलिंग व विजेची बचत याबाबत माहिती गावागावांत पोहोचवावी, असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागात वायरमन गावात वास्तव्यास नसल्याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असून त्याबाबत कठोर भूमिका घेऊन संबंधितांना नोटीस देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तारांची चोरी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील व आमदार अमोल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या व अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. त्यावर महावितरणकडून सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, प्रत्येक तालुक्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे पूर्ण करावीत, जल जीवन मिशन साठी वीजपुरवठा सुरू ठेवावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी यांनी यावेळी महावितरण व कृषी विभागाच्या सध्या स्थितीत सुरू असलेल्या कामकाजा संदर्भात सादरीकरण केले.

या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ अंतर्गत चोपडा येथील “पर्यावरणपूरक मानाचा गणपती” या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते चोपडा नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या ‘महाविस्तार – शेतकऱ्याचा डिजिटल मित्र’ या AI ॲपचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPending works of various schemes of Mahavitaran Company should be completed immediately - Guardian Minister Gulabrao Patil

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

धरणगावात परंपरागत उत्सवाची जागा धोक्यात? नागरिकांचा संताप आणि मुख्याधिकारी यांना निवेदन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात शिवसेनेतर्फे लसीकरण ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

September 29, 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसही कसणार कंबर ; जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठकीतून पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निर्धार

December 21, 2020

‘खान्देशी राजा’ या चॅनलवरील गाण्यांवर लोकांनी धरला ठेका

November 19, 2021

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा !

June 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group