जळगाव (प्रतिनिधी) महामार्गाच्या कामांमध्ये ठेकेदारांना त्रास देणाऱ्या लोकप्रतिनिधी यांची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे काही ठराविक लोकप्रतिनिधी यांच्या त्रासामुळे एल.अँड.टी सारख्या दिग्गज कंपनीला सोडून द्यावी लागली. यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरण झाले असताना जळगाव जिल्ह्यातील महामार्गाची कामे ६ ते ७ वर्ष उशिरा सुरू झाली आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. अश्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली.