मुंबई (वृत्तसंस्था) देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील बहुतांश मेट्रो शहरात पेट्रोल नव्वदीच्या पार पोहोचलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील एका शहरात तर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. राजस्थानमधील गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. सामान्य पेट्रोलचा दर इथं ९८.४० रुपये प्रतिलिटर आहे. तर एक्स्ट्रा प्रीमिअमसाठी १०१.१५ रुपये प्रतिलिटरसाठी मोजावे लागत आहेत. राजस्थानच्याच जयपुरमध्ये पेट्रोलचा दर ९३.८६ रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलचा दर ८५.९४ रुपये आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर दररोज नवनवे शिखर गाठत आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर ८६ रुपये आहेत तर मुंबईत पेट्रोलचे दर हे ९३ रुपये इतके आहेत. कोलकातामध्ये डिझेलचे दर ८० रुपये आहेत. दिल्लीत दररोज पेट्रोल आपल्या किंमती उंची गाठत आहे. दिल्लीत दररोज एक दोन दिवसांत डिझेलचे दर ७७ रुपयांच्या पार झाले आहेत. दिल्लीपेक्षा इतर मेट्रो शहरात पेट्रोलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ९२.८६ रुपये प्रती लीटर आहे. तर कोलकतामध्ये पेट्रोलचा दर ८७.६९ रुपये तर चेन्नईत हा दर ८८.८२ रुपये प्रती लीटर आहे.
4 मेट्रो शहरात पेट्रोलचे दर
शहर कालचा दर आजचा दर
दिल्ली ८६.०५ ८६.३०
मुंबई ९२.६२ ९२.८६
कोलकाता ८७.४५ ८७.६९
चेन्नई ८८.६० ८८.८२
4 मेट्रो शहरात डिझेलचे दर
शहर कालचा दर आजचा दर
दिल्ली ७६.२३ ७६.४८
मुंबई ८३.०३ ८३.३०
कोलकाता ७९.८३ ८०.०८
चेन्नई ८१.४७ ८१.७१