वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी विकसित केलेली कोविड-१९ प्रतिबंधक लस ही आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली पहिली लस ठरली आहे. मात्र ज्या फायझर कंपनीनं ही लस तयार केली त्या कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरुला यांनी मात्र ही लस घेण्यास नकार दिला आहे.
ब्रिटनमध्ये या लशीच्या लशीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर अमेरिकेनंही आपात्कालीन परिस्थितीत ही लस वापरण्याची मंजुरी दिली आहे. अमेरिकेने सोमवारी व्यापक लशीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली. कॅनडानेही कोविड प्रतिबंधक लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. तसंच सिंगापूरनेही फायझर-बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून डिसेंबरअखेरपर्यंत पहिली बॅच सिंगापूरला पोहोचणार आहे. मात्र ज्या फायझर कंपनीनं ही लस तयार केली त्या कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरुला यांनी मात्र ही लस घेण्यास नकार दिला आहे. जी कोरोना लस मिळवण्यासाठी इतर देशांनी धडपड केली ती लस तयार करणाऱ्या फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरुला यांनी मात्र त्यांना लस सहजरित्या उपलब्ध होत असतानाही त्यांनी ही लस घेतली नाही. त्यामुळे लशीबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. सीएनएनने (CNN) दिलेल्या वृत्तानुसार, स्वतःसाठी किंवा कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला लस मिळण्यासाठी आपण प्राधान्यक्रम मोडू इच्छित नाहीत, असं अल्बर्ट बोरुला यांनी सांगितलं. सीएनएनच्या संजय गुप्ता यांच्याशी बोलत असताना अल्बर्ट यांनी यामागची कारणं स्पष्ट केली. तसंच बोरुला यांनी लोकांना विज्ञानावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ही लस कोणतीही तडजोड न करता किंवा कोणताही शॉर्टकट न वापरता विकसित करण्यात आली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.