अमळनेर (प्रतिनिधी) औषध विक्रेत्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे महेश पाटील यांनी ई-मेलद्वारे आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
आज संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. एक महिन्यापासून राज्यात सगळीकडे लसीकरण सुरू आहे. महाराष्ट्रात जीवाची पर्वा न करता औषध विक्रेते २४ तास मेडिकल सुरू ठेऊन रुग्णांना औषधी पुरवत आहेत. औषध विक्रेता फार्मसीस्ट हा डॉक्टरांचा केंद्रबिंदू असतो. सध्याच्या स्थितीत जर बघितलं तर या कोरोनाच्या काळात औषध विक्रेता अतिशय जबाबदारीने काम करत आहे. राज्यात काही ठिकाणी औषध विक्रेते आपल कर्तव्य बजावत असतांना कोरोनामुळे दगावले आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.