TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने मंत्रालयात बुधवारी रात्री एक फोन आला. पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात कॉल केला होता. त्यामुळे काही काळासाठी मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट पवारांनाच हा प्रकार सांगितला. त्यावर पवारही आश्चर्यचकीत झाले. चौकशीत हा बोगस कॉल असल्याचं उघड झालं. त्यानंतर गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारीख ११ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी मंत्रालयातील सहावा मजला अर्थात मुख्यमंत्री कार्यलय येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास फोन आला. समोरचा व्यक्ती मी शरद पवार बोलतोय, अस सांगत होता. समोरून येणारा आवाज ही तसा परिचित वाटणारा…त्यामुळे वरिष्ठ अधिकारी जी सर, जी सर करू लागला…आता खुद्द शरद पवार हेच बोलत आहे म्हटल्यावर त्यांना कोण टाळणार… अधिकाऱ्यांने सविस्तर सर्व ऐकून घेतलं. समोरून बोलणारा व्यक्ती आपण शरद पवार बोलतोय. एक काम होत म्हणून फोन केला. अमुक अधिकाऱ्यांची बदली अमक्या ठिकाणी करा, अशा माझ्या सूचना आहेत. अस बोलून त्या व्यक्तीने फोन ठेवून दिला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

या प्रकाराने मुख्यमंत्री कार्यलयातील तो वरिष्ठ अधिकारी बुचकळ्यात पडला. आवाज सेमटू सेम. आलेला नंबर ही बरोबर आहे. तरीही त्याला शंका येत होती. शरद पवार साहेब स्वतः बदल्या बाबत फोन करत नाहीत. मग हे सर्व खात्री करून घ्यायच ठरलं. एक अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक गाठून शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकण्यात आला. त्यावर पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. यानंतर मात्र, शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढून तो व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचा प्रयत्नात असल्याचं उघड झाल. मात्र, हा सर्व प्रकार फसवणूक करणारा होता. यामुळे मग याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे मग सिल्वर ओक येथील ऑपरेटरने तक्रार द्यायची ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिल्वर ओक इस्टेट या ठिकाणी राहतात. यामुळे मग गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आयटी कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकानेही सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी एक संशयित व्यक्तीस ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

दरम्यान, शरद पवारांच्या आवाजाची नक्कल केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे, असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. शरद पवार यांचा आवाज काढून काम करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असंही सामंत म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात भूगोल दिवस व मकर संक्रांत उत्साहात साजरी

January 20, 2023

समस्येचा खटका पडू द्या आणि त्याचं समाधान शोधण्यासाठी प्रयत्न करा, यातूनच नविन कल्पना जन्माला येते : डॉ. प्रफुल्ल गाडगे !

March 28, 2023

धरणगाव : गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अन्नदान आणि वस्त्रदानाचा कार्यक्रम !

March 18, 2023

सर्वात आधी देशभावना महत्त्वाची : कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी !

August 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group