मुंबई (वृत्तसंस्था) फोन टॅपिंग प्रकरणात सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये तत्कालीन राज्य गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन कॉल्स टॅप केल्याचा आरोप आहे. मात्र, रश्मी शुक्लांना फोन टॅप होत असल्याची माहिती होती, असा वकिलांनी आरोप केला आहे.
शुक्ला यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात संजय राऊत यांचा क्रमांक गवळी गँगमधील संतोष रहाटेच्या नावाने टॅप होत असल्याची माहिती आहे. शुक्ला यांना काही अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. मात्र त्यांनी जाणूनबूजून दुर्लक्ष कर त्यांना खडसावलं, असं आरोपपत्रात लिहिण्यात आलं आहे.
मविआ सरकारच्या सत्ता स्थापनेच्या काळात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा समोर आले होते. या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी संजय राऊत याच्यासोबत नेमकं काय झालं होतं याबद्दल माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला. एकनाथ खडसेंचा जबाब नोदवल्यानंतर त्यातून बरीच नवीन माहिती मिळाली होती, तशीच वेगळी माहिती गोळा करण्याचा मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. यापूर्वी एकनाथ खडसे यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना हा फोन टॅपिंगचा प्रकार झाला. दरम्यान अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम १६५ आणि टेलिग्राफ कायद्याच्या कलम २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.