धरणगाव (प्रतिनिधी) फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन ५ लाख आणावे म्हणून ४० वर्षीय महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शबाना परवीन शे जैनोद्दीन (वय ४०, रा. रूम नं. ३७३१ चाळ नं २९४, सागर सोसायटी, टागोर नगर २ विक्रोळी ईस्ट मुंबई ह.मु. अहमद रजा चौक धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जैनोद्दीन शेख शमसोद्दीन, नजमाबी शेख शौकत उर्फ मुन्ना (दोघे रा. सागर सोसायटी, टागोर नगर २ विक्रोळी ईस्ट मुंबई), कासीम शेख अहमद (रा. मोहल्ला मजीद अली, अहमद रजा चौक धरणगाव), सैफोद्दीन शेख शमसोद्दीन (रा. मीरारोड वेस्ट, मुंबई) यांनी फ्लॅट घेण्यासाठी पीडित विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणावे याकरीता तसेच आरोपी पतीस पहील्या पत्नी पासुन ४ मुले असतांना फिर्यादीस १ मुलगी झाल्याने त्याच्या आरोपीतांना राग येऊन फिर्यादीचा वेळोवेळी शाररीक व मानसिक छळ करुन अश्लिल शिवीगाळ करुन गांजपाठ केला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.फौ योगेश गजानन जोशी हे करीत आहेत.