जळगाव (प्रतिनिधी) जुन्या वादातून एकावर तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्यातील मुख्य संशयितास पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. मिलिंद आखाडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
उषाबाई दिलीप नगराळे (रा.पिंप्राळा हुडको) यांच्या घरा शेजारी त्यांचा लहान भाऊ सुनील पंडीत भालेराव रा. पिंप्राळा हुडको तसेच आई नर्मदा व बहिण अशा हे तिघेही राहतात. १३ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुनील पंडीत भालेराव यास मागील भांडणाच्या वादातून मिलिंद भिमराव आखाडे, पंकज आडागे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला, विरन खैरनार या चौघांनी मंदिरासमोर कोयते व तलवारीने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात मिलिंग आखाडे, पंकज आडागे, पंकज उर्फ पंक्या रिक्षावाला, विरन खैरनार या चौघाविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य संशयित आरोपी तेव्हापासून फरार होता. परंतू गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण यास संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुहास राऊत, विनोद सोनवणे, विजय खैरे, उमेश पवार, रवी पाटील, रवी चौधरी यांच्या पथकाने मध्यरात्री मुख्य संशयित मिलिंद आखाडेला सापळारचून अटक केली.