पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील हॉटेल शितल जवळ असलेले देशी दारूचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १९ पेट्या लंपास केल्याची खळबळजनक घटना आज (शुक्रवार) रोजी सकाळी उघडकीस आली.
या संदर्भात अधिक असे की, हॉटेल शितलजवळ देशी दारूचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मागची भिंत फोडून साधारण १९ पेट्या लंपास केल्या आहेत. या पेट्यांची किंमत साधारण ५० हजाराच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी एक पथक घटना स्थळी रवाना केले. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हि कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या आधी देखील या दुकानात चोरी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
















