जामनेर (प्रतिनिधी) ज्या व्यक्तींच्या तोंडाला मास्क न लावल्याचे आढळून येतील त्यांना आता पाईपाचे फटके व दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई जामनेर शहरात सुरु झाली आहे. जामनेर नगरपालिका मार्फत कोरोना अधिक पसरू नये यासाठी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईसाठी बचत गटाचे महिलांचे सहकार्य घेऊन गुलाब गँग पथक तयार केले आहे.
सदरील महिला पथक मुख्य रस्त्यावरून विना मास्क फिरणारे व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना हातातील प्लास्टीक पाईपाने फटके देऊन तर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू झाली आहे. या कारवाई पथकात जामनेर नगरपालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचाही समावेश आहे. कोरोना आजार पुन्हा पसरत आहे. त्यामुळे नागरीकांनी तोंडाला मास्क, सुरक्षित अंतर, काही लक्षण असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी, प्रशासनाच्या सुचना आदेश काटेकोर पाळावे, सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी केले आहे.