नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जनआंदोलन उभारणार आहेत. यामध्ये करोनापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून शपथ देण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
हिवाळा आणि सणांमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामुळे पंतप्रधान जनआंदोलनाद्वारे नागरिकांना आवाहन करणार आहेत. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश मोदी देणार आहेत. या नव्या मोहिमेतून पंतप्रधान मोदी १३५ कोटी भारतीयांना करोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ दिली जाईल. जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत शिथिलता नाही, असे ट्विट मोदींनी यावेळी केले आहे.
















