TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वर्षभर शेतात राबणाऱ्या वृषभराजा बैलांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जैन हिल्सच्या हेलिपॅड पटांगणात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव येथील वीर योद्धा ग्रुपच्या सदस्यांनी ढोल, ताशा, झांझांच्या गजरात आखाडा, पिऱ्यामीड, तलवार दांडपट्टा यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके, (गुजरात) नर्मदा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी सादर केलेले होलीका नृत्य, मानवी मनोऱ्यांमधून साकारलेला श्रीकृष्ण रथ, शिरसोली येथील ढोल, ताशे तर सावखेडा येथील संबळ वाद्याच्या ठेक्यावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व पोळा सणासाठी आलेल्या पाहुण्यांनी नृत्याचा ठेका धरला. मानाचा पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी मिळविला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अनिश शहा, स्वरुप लुंकड, पारस राका, विनय पारख, हेमंत कोठारी, प्रतिभा शिंदे, माजी नगरसेवक अमर जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, प्रशिक्षक मंदार दळवी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, डॉ. सुभाष चौधरी, राजा मयूर, फरहाद गिमी, शिरीश बर्वे, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, महिला क्रिकेट खेळाडू, पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. जैन हिल्स हेलिपॅडवर पोळ्यासाठी भव्य दिव्य पोळ्याच्या क्षणचित्रांचे छायाचित्रे असलेल्या पार्श्वभूमिवर सजावट केलेले मंडप व व्यासपीठ उभारण्यात आले होते.

READ ALSO

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

भारतीय कृषीक्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी १०० वर्षे तरी बैलाविना शेती हे समीकरण अबाधित राहणार आहे. भारतातील ही सॉईल संस्कृती गाय बैलांमुळे टिकून राहिली आहे असे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी आपले विचार व्यक्त केलेल तंतोतंत खरे आहेत. श्रद्धेय भाऊंनी जैन हिल्स येथे पोळा सण साजरा करण्याचा पायंडा सुरू केला आहे तो अव्याहत सुरू आहे असे कार्यक्रमाच्यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.

वाडा शिवार सारं, वडिलांची पुण्याई

किती वर्णू तुझे गुण, मन मोहरून जाई

तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई

एका दिवसाच्या पूजेनं होऊ कसा उतराई ।।

या काव्य पंक्तीनुसार पोळ्याच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता ध्यानमंदिरापासून बैलांची सवाद्य मिरवणूक सुरू झाली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ असलेल्या श्रद्धा धाम, श्रद्धा ज्योत येथे वंदन नमन करून ही मिरवणूक मारुतीच्या मंदिराजवळ आली. सरस्वती पॉईंट येथे नृत्य व काही चित्तथरारक प्रात्यक्षिके झाले. ११ वाजता पोळा फोडला गेला. पोळा फोडल्यावर जैन परिवारातील सदस्यांसह मान्यवरांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा गोड घास भरविला गेला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर सालदार स्नेहभेट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनजे व किशोर कुळकर्णी यांनी केले.

सालदार गडींचा सपत्नीक गौरव…!

श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्या कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, जेआरसी वैजनाथ साईट, जैन सोसायटी शिरसोली अशा विविध ठिकाणाच्या शेती विभागातील ४८ सालदार गडींचा सपत्नीक स्नेहभेट देऊन गौरव केला गेला. त्यात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, सौ. शैलाताई मयूर, सौ. शारदा चौधरी, अनिश शहा, डॉ. अनिल ढाके, विजयसिंग पाटील, प्रवीण जैन, सौ. निशा जैन, डॉ. भावना जैन, शेती विभागाचे संजय सोनजे या मान्यवरांच्याहस्ते हा स्नेह भेट देऊन गौरव करण्यात आला.

पुरणपोळीचा सुग्रास पाहुणचार…!

जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंडवर पुरणपोळी-खीर असा सुग्रास पाहुणचार पोळ्या निमित्ताने होता. ही व्यवस्था राजाभोज खानपान विभागाच्या सहकाऱ्यांच्यावतीने उत्तम केली होती शहरातील निमंत्रीतांसह जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांनी या पाहुणचाराचा लाभ घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

अमळनेरहून धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे मार्गाचा वापर करण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ॲट्रोसिटी प्रकरणात केतकी चितळेला जामीन

June 16, 2022

ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणला तर फासावर लटकवू : उच्च न्यायालय

April 24, 2021

ब्रेकिंग : लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार?, पत्र व्हायरल ; निवडणूक आयोग म्हणाले…!

January 23, 2024

धरणगावचे माजी नगरसेवक जगदीश धुरेकर यांचा भाजपात प्रवेश !

February 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group