भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा कारागृह येथे न पाठविण्यासाठी व भेटू देण्याच्या मोबदल्यात २ हजाराची लाच स्विकारतांना भुसावळ कारागृहातील पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांचा मुलगा दुय्यम कारागृह भुसावळ येथे असुन त्याला जळगाव जिल्हा कारागृह येथे न पाठविण्यासाठी व जेलमध्ये त्याला घरचे जेवणाचा डबा देणे, भेटू देण्यासाठी व इतर सवलती देण्याच्या मोबदल्यात आरोपी पोलीस नाईक अनिल लोटन देवरे यांनी तक्रारदार यांचेकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडे देवरे यांनी २ हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील व पोलीस निरीक्षक संयोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना. जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ. नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.