जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एम.जे. कॉलेजजवळ स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरुन त्याचे स्पेअर पार्ट वेग-वेगळ्या करणाऱ्या टोळीला पकडले. यावेळी सात दुचाकी जप्त करण्यात आल्या असून तिघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून त्याचे सुटे भागांची परस्पर विक्री करून सुरत येथे मौजमजा करण्यासाठी निघालेल्या शाहरूख खान सलिम खान (वय-२०, रा. पाटील चक्की जवळ, सुप्रिम कॉलनी) आणि अमन सैय्यद रशिद (वय-१८, अजिम किराणा दुकानाजवळ, सुप्रिम कॉलनी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील मु.जे.महाविद्यालयाजवळ आज अटक केली. दोघांनी एकुण ११ दुचाकी चोरल्या असून त्यापैकी ४ दुचाकी तिसरा सहकारी इमराज रमजान पटेल (वय-२१, रा. सुप्रिम कॉलनी) याला विल्हेवाट लावण्यासाठी दिल्या होत्या, त्यालाही पथकाने अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेढे, रवि नवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन यांनी केली.