जळगाव (प्रतिनिधी) जिल्हापोलिस दलातर्फे शहरात अचानकपणे कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले असून त्यात दोन संशयीत आरोपी हद्दपार आदेश झुगारून शहरात वास्तव्यास असलेल्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधीकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनात शहरातील संवेदनशील भागात कालरात्री कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले. कोम्बींग ऑपरेशनमध्ये सहभागी पहिल्या पथकाने शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुरुनानक नगरातील सुनील ऊर्फ लखन भगवान सारवान(वय-३४) हा हद्दपारीतील संशयीत पेालिस तपासणीत आढळून आला. तर, दुसऱ्या पथकाला समाधान हरचंद भोई(वय-२८,रा.खंडेरावनगर) हा हद्दपार अट्टल गुन्हेगार मिळून आला. दोघांना ताब्यात घेत त्यांनी हद्दपार आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली आहे.