जळगाव (प्रतिनिधी) अपघातग्रस्त वाहन सोडविण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने पो.कॉ. सुमित संजय पाटीलला अटक केली होती. याप्रकरणी आता पाळधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
भुसावळ येथील २७ वर्षीय तरुणाच्या वाहनाचा चालकाकडून काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. पाळधी दूरक्षेत्रात ठाण्यात गुन्हा दाखल होता. संबंधिताचे जप्त चारचाकी वाहन सोडविण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सुमित पाटील याने पंधरा हजाराची लाच तक्रार दाराकडून मागितली होती. वाहन सोडण्यासाठी वाहन मालकाकडून पंधरा हजाराची लाच घेताना सुमित संजय पाटील या पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जानेवारी रोजी अटक केली. सुमित पाटील हा सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड यांचा रायटर होता. रायटरने लाच घेतल्याने पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी नियंत्रण कक्षात जमा केले.
















