चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध चाळीसगाव पोलिसांनी ‘वॉश ऑऊट’ मोहीम सुरु केली आहे. आज याच मोहिमेसाठी शहरात पोलीस रस्त्यावर उतरले असून कुठेही अवैध धंदे दिसताच धडक कारवाई केली जाणार आहे.
अवैध धंदेवाल्यांविरुद्ध पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण शहरात पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या सह डी.बी. पथकातील दंडाधारी कर्मचारी गस्त घालत आहेत. अवैध धंदे दिसताच धडक कारवाई करणार असल्याची माहिती पो.नि. ठाकुरवाड यांनी दिली आहे. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी ६७ लाखाचा गुटखा पकडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. गुटखा व गांजाचे चाळीसगाव शहर हब असल्याचे म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर चाळीसगावात पोलिसांनी अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध वॉश ऑऊट मोहीम सुरु केल्याचे बोलले जात आहे.