पाचोरा (प्रतिनिधी) शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे आजपासून जिल्हा दौर्यावर आले आहेत. परंतू तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रमुख पदाच्या वादातून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी जेष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक रावसाहेब पाटील यांचा विचार न केल्यामुळे राजीनामे देत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियात फिरत असलेल्या मॅसेजनुसार पाचोरा तालुका शिवसेनेचे सर्वात मोठे पद विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे यांनी संघटनेच्या जिल्हाप्रमुख पदावर जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक रावसाहेब पाटील यांचा विचार न झाल्याने तसेच पाचोरा-भडगाव तालुक्याला पुन्हा डावलल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. तसेच उपतालुकाप्रमुख धर्मराज पाटील, कृष्णा सोनार, विभागप्रमुख गणेश देशमुख, भैय्यासाहेब महाजन, संदीप सोमवंशी,राहुल राजपुत, उपविभाग प्रमुख किरण पाटील, धर्मेंद्र पाटील, गणप्रमुख भारत भामरे यांनी राजीनामा दिला आहे.
याच पद्धतीने पाचोरा तालुका शिवसेनेचे नगरदेवळा विभागप्रमुख भैय्यासाहेब महाजन, युवासेनेचे पाचोरा तालुका सरचिटणीस सोनु परदेशी, सागर पाटीलसह सर्व नगरदेवळा युवा सैनिकांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये – नगरदेवळा युवासेनेचे गटप्रमुख कडू दौलत पाटील, गणप्रमुख पियुश राजपुत, गणप्रमुख गणेश महाले आणि माजी तालुकाप्रमुख व युवासेना सल्लागार सागर पाटील यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे नगरदेवळा शिवसेना शहर प्रमुख सुनील महाजन, माजी शहरप्रमुख विनोद भाऊ राउळ, दत्तू भाऊ भोळे, सुनील मिस्त्री यांनीसुद्धा राजीनामे दिले आहेत.
कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटांमधील सर्व शिवसेना व युवासेना नाराज निष्ठावंत पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्याकडे सोपविले आहेत. यामध्ये शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख युवराज काळे ,विनोद बाबुराव पाटील, विभागप्रमुख सुनिल नारायण पाटील,उपविभाग प्रमुख बालाजी पाटील, सुनिल पाटील लाजगाव,गणप्रमुख सागर दामु पाटील, अतुल कांतीलाल पाटील यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर युवासेनेचे उपतालुकाप्रमुख निलेश गवळी,रोहीत पाटील,जितु पाटील, अनिल सोनवणे,जनार्दन पाटील यांनी पण राजीनामा दिला आहे. दरम्यान, जळगाव पक्षनेतृत्वावर निष्ठावंत पदाधिकारी संतापले असून पाचोरा तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एवढे राजीनामे एकाचवेळी स्विकारले तर शिवसेनेसमोर मोठे संकट उभे होईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, संबंधित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.