TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी रेखांकित स्वतःचे स्केच पाहून फर्डे वक्ते शब्दप्रभू माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी झाले निःशब्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) आर्यन एज्युकेशन सोसायटी, पालघर (कोकण) येथील म.नी.दांडेकर विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी सपत्नीक चोपडा येथे प्रत्यक्ष जाऊन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पेन्सिल स्केच सविनय स्नेह भेट दिले. स्केचमध्ये अरुणभाईंचे चैतन्यदायी सदाबहार हास्य डोळ्यातून ओसंडून वाहणारा अदम्य आत्मविश्वास मांगल्यपूर्ण कुलीन मनोवेधक विद्वत्ता माळींनी भाईंच्या व्यक्तिमत्वाचे अंतर्बाह्य दर्शन जादुई रेषांनी अप्रतिम साकारले ! बिंबाहून प्रतिबिंब सरस या संभ्रमाने भाई फर्डे वक्ते असूनही चक्क अवाक होऊन निःशब्द झाले.

यावेळी उपस्थितांनी माळी यांना कौतुकांच्या प्रतिक्रियांनी अक्षरशः न्हाऊ घातले ! याप्रसंगी दि चोपडा बॅंकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, जेष्ठ उद्योजक आशिषशेठ गुजराथी, प्रसन्नभाई गुजराथी, आशिष गुजराथी, प्राचार्य राजेंद्र महाजन (ललित कला केंद्र चोपडा), विनोद पाटील, जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कळसूत्रकार दिनेश साळुंके, अक्षरशिल्पी जेष्ठ कलाशिक्षक वसंत नागपुरे, मिलिंद शहा, भगवान बारी, प्रविण मानकरी, अतुल अडावदकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कलाशिक्षक माळी यांनी कोरोना लाॅकडाऊन काळात महाराष्ट्रातील १०० च्या वर मान्यवरांची व्यक्तिरेखाटने काढली. समर्पित सेवा कलेतून करीत राष्ट्र सेवेचा आदर्श कलाशिक्षकांसमोर विनम्रतेतून माळी यांनी ठेवला आहे. रेखाटनातून प्राप्त एकूण रुपये ११,१११ त्यांनी कोविड १९- मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी दिली.

READ ALSO

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

या १०० व्यक्तिरेखांकनांचे “शतचित्राणी” हे आगळेवेगळे पुस्तक स्नेही शिक्षक रविंद्र नाईक (स.तु.कदम विद्यालय,पालघर) यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ बंधू आर्किटेक्ट प्रमोद माळी व गुरुवर्य राजेंद्र महाजन यांच्या कलात्मक अमूल्य मार्गदर्शनाने लवकरच जळगाव येथील अथर्व प्रकाशन मार्फत प्रकाशक युवराज माळी व संगिता माळी प्रकाशित करीत आहे. प्रकाशनास आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भास्कर उसपकर, संस्थेचे विश्वस्त भास्कर हाटे व गॉडफादर ज्ञानेश्वर कानडे, सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रफुल्ल घरत, (माजी अध्यक्ष,पालघर जिल्हा कलाध्यापक संघ) प्रमोद पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

ज्ञानेश्वर माळी यांना अखिल भारतीय कलाध्यापक संघांमार्फत सांगली येथील राज्य अधिवेशनात ‘आदर्श कलाशिक्षक पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे. पालघर रेल्वे स्टेशनचा परिसर त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने सुशोभित केला आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत, पूरग्रस्तांना मदत, मुक्या प्राण्यांना जीवनदान, रक्तदान शिबिर आयोजन, समाज प्रबोधनात्मक उपक्रम इ. माळी सरांनी यशस्वीपणे राबवून परिसर कलामय केला आहे. ज्ञानेश्वर माळी यांचा व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, ती चित्रणात हातखंडा आहे. ज्ञानेश्वर कौतिक माळी हे ललित कला केंद्र चोपडा या ग्रामीण भागातील मात्र महाराष्ट्रभर नावाजलेल्या कलासंस्थेचे सन १९९५ ते २००१ बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या शतचित्राणी व्यक्तिरेखांकन प्रस्तावित पुस्तकांचे अरुणभाई गुजराथी साहेबांनी व्रतस्थ कलाशिक्षक माळी यांना कौतुकाची थाप देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
Next Post

PNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यास नकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट दस्ताऐवज खरे भासवून १०, लाख २० हजारांत फसवणूक ; पाचोरा पोलिसात सहाय्यक निबंधकांसह दोन जणांविरुद्ध गुन्हा !

April 5, 2022

महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी ; गुन्हा दाखल !

March 4, 2025

सरकारची भन्नाट योजना : ५५ रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देणार हजारोंचा फायदा ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती

April 2, 2022

महावितरणच्या खासगीकरणाच्या वावडया भाजप उठवत आहे : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

February 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group