मुंबई (वृत्तसंस्था) पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यामुळे कुंद्राची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि निर्माता राज कुंद्रा याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथेही त्याला दिलासा मिळालेला नाही. राज कुंद्राच्या बेकायदेशीर उद्योगांबद्दल आणखी माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रेयान थोर्पे दोघांनाही आणखी काही दिवस पोलीस कोठडीतच राहावं लागेल. २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवायचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान राज कुंद्रा प्रकरणी दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. राज कुंद्रा अश्लील कंटेट आणि पोर्नोग्राफीची निर्मिती करायचा आणि ते वितरित करण्यासाठी दररोज व्हाट्सअँप ग्रूप तयार करायचा अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.
















