चोपडा (प्रतिनिधी) तापी पुलावरील खड्डे बुजविल्यामुळे कॉ. अमृत महाजन यांनी बांधकाम खात्याला त्रिवार धन्यवाद मानले आहेत.
गेल्या पावसाळ्यात सावखेडा नजीक तापी नदीच्या पुलावर मोठमोठे खाच खड्डे पडले होते. वाहन चालकांना पूल पार करणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याविरुद्ध जनतेत फार मोठा असंतोष निर्माण झाला होता.
शेवटी गेल्या 13 सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलनाचे नियोजन चोपडे व खाचणे गावातील सनमान्य नागरिक/ ग्रामस्थांनी दिला होता. मध्यंतरी पावसाची रिपरीप सुरू झाल्याने काम तहकुब झाले होते.
गेल्या तीन दिवसात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने लक्ष घालून सदर पुरावरचे खड्डे बुजवून पूल वापरणे योग्य केला आहे. त्याबद्दल बांधकाम खात्याला त्रिवार धन्यवाद देणारे पत्रक कामगार नेते कॉ.अमृत महाजन यांनी काढले आहे. धन्यवाद देताना त्यांनी अपेक्षा केली आहे की, मुख्य रस्त्यांवर कुठलेही खड्डे पडले की, लोकांच्या सहनशीलतेचा व पाठीच्या कणा मानेचा खिळा दुखापत होण्याची वाट न पाहता ताबडतोब खड्डे बुजवण्याची कार्यवाही करावयास हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.