अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जवान सीमेवर कर्तव्यावर असतांना दुसरीकडे मात्र, त्यांच्या परिवाराला आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत शितल नंदलाल माळी यांनी पालिकेसह विविध ठिकाणी तक्रार केली आहे.
शितल माळी यांनी पालिकेकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे पती आर्मीमध्ये कार्यरत आहेत. मी माझ्या दोन लहान मुलांसह दिड महिन्यापासून सदर घरात राहत आहे. मी राहत असलेल्या घरा शेजारची भिंतीला लागून सुरू असलेला कोंबडी पोल्टी फार्ममुळे आम्हाला भयंकर त्रास होत आहे. माझ्या मुलांच्या अंगावर पुरळ येणे, खाजसुटणे, दुर्गंधी येणे यासह अनेक आरोग्याचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे सदर सुरू असलेला पोल्ट्रीफार्म हा रहीवास परिसरापासून दुसरीकडे हलविण्यात यावे.
मी ह्या घरात माझ्या मुलांबाळासंह एकटी राहत असून, मी शेजारील कोंबड्यांचे पोल्ट्रीफार्म मालकास विनंती करून सांगतले की, बाबा सदर कोंबड्यांचे पोटफार्ममुळे आम्हाला रोजचा त्रास होत असून हा पोल्ट्रीफार्म दुसरीकडे घेऊन जा. त्याउलट त्यांनी माला सांगितले की, तुला जेथे जावायचे असेल तेथे जा, मी माझा कोंबड्यांचे पोल्ट्रीफार्म येथुन कोठेही घेऊन जाणार नाही. एवढेच नव्हे तर या व्यतिरीक्त मी इतर काही जनावरे अजून पाळणार आहे. तुझ्याने जे होईल ते करून घे. मी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे. तसेच माझा मुलगा पोलीसमध्ये कार्यरत आहे. तुझ्याने जे होईल ते कर. तुला कोठे जायचे आहे तेथे जा, असे सांगितले.
यामुळे माझे किंवा माझ्या मुलांचे काही बरेवाईट झाल्यास सदर पोल्टर्टीफार्म मालक जबाबदार राहील. माझे पती हे देशसेवत कर्तव्य बजावत (आर्मीमध्ये) असून ते घरी लवकर येत नाही. सदर इसम हा धाक दडपण दाखवून घाबरवत असतात, त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा ही विनंती, असेही शितल माळी यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे. या तक्रारी अर्जाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री,जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव पोलीस अधिक्षक, अमळनेर उपविभागीय अधिकारी, अमळनेर तहसिलदार, अमळनेर पोलीस निरीक्षक यांच्याकडे रवाना केल्या आहेत.