अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून जाणारा रा.मा ०६ (प्रबुद्ध विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा ०६ ची संपुर्ण चाळण झाली होती. बांधकाम विभाग वेळोवेळी आश्वासन देऊन कामाकडे दुर्लक्ष करत होते. या पार्श्वभूमीवर तरुण मित्र परिवाराच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रांताधिकारी यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदाराकडून डांबरीकरनाचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याबाबत आदेश दिले.
विशेष करून सुभाष चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूलपर्यंत धुळीचे वातावरण होऊन प्रदूषण होत होते. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रासाचा तक्रारीत वाढ झाली होती. त्यास अनुसरून जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य पंकज चौधरी यांनी वेळोवेळी निवेदन देऊन व आंदोलन करून नगरपरिषद व सा. बांधकाम विभाग जबाबदारी घेण्यास तयार होत नव्हते व वेळोवेळी आश्वासन देऊन कामाकडे दुर्लक्ष करत होते. म्हणून शेवटी जलसंपदा मंत्री दि. ११ रोजी अमळनेरला येणार असल्याचा पार्श्वभूमीवर तरुण मित्र परिवाराच्यावतीने पंकज चौधरी, नगरपरिषदेचे गटनेते प्रवीण पाठक, बाळासाहेब संदानशिव, संतोष लोहेरे, पराग चौधरी, किरण बागुल यांनी निवेदन दिले होते. व मंत्री महोदयांना रा.मा १५ वरून फिरू देणार नाही व तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच प्रांताधिकारी यांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून अहवाल सादर करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार नगर परिषदेने गटारीवरील धापे दुरुस्ती सुरू केली व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदाराकडून डांबरीकरनाचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याबाबत जिल्हानियोजन समितीचे सदस्य यांना नगरपरिषदेने पत्र देत उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यासह सा.बा.चे महाजन पाटील व नगरपरिषदेचे अभियंता संजय पाटील, संजय चौधरी यांचा सोबत पाहणी करत प्रांताधिकारी अहिरे व डी वाय एस पी राकेश जाधव यांचे आभार मानत आंदोलन स्थगित केले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, पराग चौधरी, चेतनआबा पाटील, हरिश्चंद्र पाटील, स्वामी चौधरी, पारस धाप, सुरेश चौधरी, श्रीराम चौधरी, अख्तर सैय्यद, नितीन लोहेरे आदींसह आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवाराचे व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.