भुसावळ (प्रतिनिधी) तालुकच्याचे उर्दू केंद्रचे प्रभारी केंद्र प्रमुख व जिल्हा परिषद उर्दू शाळा कंढारीचे मुख्याध्यापक अशफाक सर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले असून त्यांना प्रगससूर्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
भुसावळ तालुक्यातील सर्व शिक्षकांशी अशफाक सरांचा चांगला संबंध आहेत आणि ते शिक्षकांना कायमचे मदत करत असतात. भुसावळचे गट शिक्षण अधिकारी तुषार प्रदान यांनीही याप्रसंगी अभिनंदन केले आहे. भुसावळ सोसायटीचे संचालक प्रदीप सोनवणे, ग.स संस्थेचे संचालक योगेश इंगळे, अमित सर, सादिक सर, रिजवान सर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. बोदवड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळाचे मुख्याध्यापक इक़बाल सर सादिक सर जावेद सर नजमा बाजी रिफत बाजी ईफत बाजी सुजौर रहमान नयमत सर यांनी ही तयांचे अभिनंदन केले.