फैजपूर (प्रतिनिधी) ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या मार्फत सामाजिक न्याय भवन येथे उत्कृष्ट दिव्यांग कलाकार म्हणून योगेश चौधरी दिव्यांग सेना फैजपूर सचिव यांचा डॉ. अभिजित राऊत जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळेस पुष्पगुच्छ, शॉल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यावेळेस मुन्नाने त्यांना आपल्या हस्तकले विषयी माहिती देऊन त्यांना सुद्धा आपल्या स्वतःच्या हाताने तयार केलेली कलाकृती भेट म्हणून दिली. प्रसंगी सर्वानी योगेश चे कौतुक आणि अभिनंदन केले. यावेळी समाजकल्याण उपआयुक्त मा. योगेश पाटील, समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, गणेशकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे, विशाल दांडगे, पराग वारके उपस्थित होते.