मुंबई (वृत्तसंस्था) टॉप ग्रुपचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांडोले यांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे १२ तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची निकटवर्तीय आणि मोठ्या पदावर असलेले अमित चंडोळे यांना ईडीनं दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीकडून सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आली होती. पुन्हा चौकशी करण्यासाठी विहंगला गुरुवारी ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे जुने निवासस्थान आणि समता नगरमधील मुख्य जनसंपर्क कार्यालय ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीत छाबियास विहंग सोसायटीत अमित चंडोळे राहतात. अमित चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. प्रताप सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात व्यवसायासाठी आले. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. विहंग ग्रूप ऑफ कंपनीला मोठा फायदा होत गेला. अमित चंडोळे सध्या या कंपनीच्या डायरेक्टरपदावर आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. टॉप सिक्युरीटी आणि विहंग ग्रुप ॲाफ कंपनी यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे अमित चंडोळे आहे असं सांगितलं जात आहे.
प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. दुसरीकडे अमित चंडोळे यांचा मोठा सहभाग टॉप सिक्युरीटीमध्ये असल्याने आणि त्यांचा विहंग ग्रुप ॲाफ कंपनीशी संबंध असल्याने विहंग सरनाईक आणि प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.