अमळनेर (प्रतिनिधी) बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना अल्प दरात माती परीक्षण करून मिळणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनखाली बाजार समिती विकासाच्या दृष्टीने पाऊले टाकत असून यापुढे देखील भर देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाने सत्तेची सूत्र हातात घेतल्यापासून विकासकामांचा धडाका लावलेला आहे. यात समितीतील सर्व हमाल, मापाडी व कर्मचारी यांचा तिन वर्षासाठी मोफत विमा काढला असुन काही कर्मचाऱ्यांना १२ वर्षे सेवेत पूर्ण झालेली होती. त्यांना पदोन्नतीही व कालबध्द पदोन्नती दिली. शेतकरी बंधु यांना कमी खर्चात चहा, नाश्ता मिळावा, यासाठी महिला बचतगट यांच्या माध्यमाद्वारे कॅन्टीन सुरू केली. कर्मचाऱ्यांना संगणकाव्दारे समितीची कामे सुलभ होणेसाठी सॉफ्टवेअर घेतल्याने कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे झाले. बाजार समिती मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर खड्डे झाल्याने तेथे पाणी साचत होते व शेतकरी बंधु, इतर घटक यांना बाजार समितीत ये-जा करतांना त्रास सहन करावा लागत होता. या दृष्टीने गेटसमोरील रस्ता कॉक्रीटीकरण करून घेतला. बाजार समितीचे सर्व व्यवहार हे संगणकीकृत व्हावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत.
शेतकरी बंधु यांना व व्यापारी हमाल मापाडी, कर्मचारी यांना नगरपालिकेकडुन नविन पाईप लाईन टाकून पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून दिले. त्यामुळे बाजार समितीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आलेला आहे. गाळणी चाळणी यंत्र सुद्धा सुरू करण्यात येत आहे. पातोंडा येथे बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी पेट्रोल पंप सुरु करीत आहोत. बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना अल्प दरात माती परीक्षण करून मिळणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनखाली बाजार समिती विकासाच्या दृष्टीने पाऊले टाकत असून यापुढे देखील भर देण्यात येणार आहे. असे मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी पत्रकारपरिषदेत केले. यावेळी प्रशासक प्रा. सुरेश पाटील, बी.के. सूर्यवंशी, विजय पाटील, जितेंद्र राजपूत सचिव बाळासाहेब शिसोदे उपस्थित होते.