गुवाहाटी (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच शिंदे गटाने पुढील रणनीती आखण्यासाठी गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बैठक सुरु केली आहे. शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्यावर चर्चा केली जात आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाची कोअर कमिटीची बैठक सुरु होत आहे. या बैठकीत देखील भाजपाची पुढील रणनीती काय असले? यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर शिंदे गट राज्यपालांकडे ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्याची शक्यता आहे. यासाठी शिंदे गट मुंबईत येणार की, त्यांचे प्रतिनिधी येणार, हे अद्याप ठरलेले नाहीय. परंतू आमदार मुंबईत आले तर ते आपल्याबाजुने येतील, अशी आशा शिवसेनेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज बंडखोर आमदारांवर १२ जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे म्हटले आहे. परंतू, शिंदे गट किंवा भाजपा ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यावर न्यायालयाने बंदी घातलेली नाही. जर एखादा पक्ष या फ्लोअर टेस्टविरोधात आपल्याकडे दाद मागण्यासाठी आल्यास आम्ही तात्काळ त्याची दखल घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे.