यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव शहर आणि फुलसावंगी येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पाऊस सुरू होण्याआधी जोरदार मेघगर्जनेसह पावसाला (Rains) सुरूवात झाली. दरम्यान, हवामान खात्याने ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेबरोबरच पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली आहे. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच शेतात देखील पाणी साचल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या पावसामुळे उष्णतेचा त्रास कमी झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेबरोबरच पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही झाली आहे. यामुळे सर्वसामान्यही पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच अंदमानात मान्सूनचे आगमन झाले आहे. तब्बल ६ दिवस अगोदर मान्सून अंदमानमध्ये पोहोचला आहे. यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. अंदमानात लवकर हजेरी लावल्याने आता राज्यात सर्वत्र वरुणराजाचे लवकरच आगमन होणार आहे.
















