जळगाव (प्रतिनिधी) लष्करातील जवानांचे मेडीकल चेकअप करायचे असल्याचे सांगत फोन पेची संपूर्ण माहिती जाणून घेत एका महिला डॉक्टरला खात्यातून १ लाख २४ हजार ९९२ रुपयांत गंडवल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवार दि. १० जून रोजी अज्ञातांविरु द्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुझे ४० ते ५० जवान का चेकअप करना है !
शहरातील गांधीनगरात डॉ. सुजाता प्रमोद महाजन या वास्तव्यास असून त्यांचे हॉस्पिटल आहे. दि. २० मे रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला, समसोरील व्यक्तीने त्यांना आर्मी ऑफिसर असून तुमच्याकडे पेशंटला चेकअपला आणाचे आहे. त्यासाठी आपले विझीटिंग कार्ड माझ्या व्हाट्सअपला पाठवा असे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांच्या ड्रायव्हरने त्याच्या मोबाईलवरुन समोरील व्यक्तीला कार्ड पाठवले. दुसऱ्या दिवशी महिला डॉक्टरचे पती प्रमोद महाजन हे ड्रायव्हरला घवून मेडीसीन घेण्यासाठी गेले होते. यावेळी ड्रायव्हर दिलीप नाईक यांना समोरील व्यक्तीने फोन लावला. त्याने मुझे ४० ते ५० जवान का चेकअप करना है असे सांगितल्यानंतर ड्रायव्हरने हमारा लेडीज स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे, या पे जवान का चेकअप नही होता हे असे सांगितले. कार्ड पे सर का नाम दिया है, सर को कॉल दो असे त्याने व्यक्तीने सांगितले.
ऑनलाईन पेमेंटसाठी मागितला क्रमांक
ड्रायव्हर नाईक यांनी डॉक्टरांना फोन दिल्यानंतर समोरील व्यक्तीने जवान तो पैसे नही भरेंगे हम ही भरेंगे ऑनलाईन पेमेंट करना है, आपका नंबर दिजीए असे सांगितल्यानंतर डॉ. प्रमोद महाजन यांनी त्यांची पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन पे क्रमांक दिला.
डिटेल्स मिळताच केले पैसे ट्रान्सफर
ऑनलाईन ठगाने डॉ. सुजाता महाजन यांच्यासोबत संपर्क साधून त्यांच्याकडून फोन पेची संपुर्ण डिटेल्स घेतली. त्यानंतर फोन चालू असतांनाच डॉ. महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होवू लागले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून सुमारे १ लाख २४ हजान ९९२ रुपये ट्रान्सफर झाले. त्यांना आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी दि. १० जून रोजी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.