जळगाव (प्रतिनिधी) पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे गाड्या चेकींग सुरु आहे असे म्हणत वृद्धाच्या हातील दोन अंगठ्या, गळ्यातील चैन व खिशातील ३० हजार रुपये रुमालात बांधले. तो रुमाल त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवत असल्याचे सांगत ऐवज चोरुन नेल्याची घटना शिला प्राईडजवळ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीतील सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र चटरुमल पारप्यानी (वय ६२) हे दि. ४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास (एमएच १९, ०९६९) क्रमांकाच्या वाहनाने जूना मेहरुन रोडवरील बाबा नगरातून जात होते. यावेळी शिला प्राईडजवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरुन त्यांना सुमारे ३० ते ४० वयोगटातील दोन दुचाकीस्वार इमस त्यांच्याजवळ आले. त्यांनी वृद्धाला आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी केली. तसेच पुढे गाड्या चेकींग सुरु असून तुमच्याच्याकडे असलेले सोन्याचे दागिने आणि पैसे या रुमाला टाकून तो डिक्कीत ठेवा असे सांगितले. बतावणी करणाऱ्या त्या इसमांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पारप्यानी यांनी त्यांच्या हातातील दोन अंगठ्या व गळ्यातील चैन व लॉकेट असा १२ ग्रमचे सोन्याचे दागिने आणि त्याच्याजवळील ३० हजारांची रोकड असा एकूण ८० हजारांचा ऐवज त्या इसमांनी त्यांच्याजवळील रुमालात बांधून तो तुमच्या डिक्कीत ठेवतो असे म्हणत चोरुन नेला.
पोलिसात धाव घेत दिली तक्रार
काही वेळानंतर प्यारपानी यांनी डिक्कीत ठेवलेले पैसे आणि दागिने बघितले असता, त्यांना काहीही दिसून आले नाही. त्यामुळे त्या दोघ इसमांनी आपली फसवणुक केल्याची खात्री पटताच त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहे