नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाविरूद्ध भारतात लसीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदी देशाच्या तीन प्रमुख प्रयोगशाळांना भेट देत आहेत. पंतप्रधान आज अहमदाबादमधील जायडसच्या बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या भेटीवर आहेत. दरम्यान, सध्या पंतप्रधान अहमदाबादच्या जायडस बायोटेक पार्कमध्ये पोहचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या जायडस बायोटेक पार्कमध्ये पोहोचले आहेत. ते येथे संशोधकांना भेटत आहेत. पंतप्रधान मोदी कोरोना लसीशी संबंधित अनेक पैलूंवर संशोधकांशी बोलत आहेत. यामध्ये उत्पादन, साठवण, कोरोना लसीचे वितरण समाविष्ट आहे. जर लस तयार झाली तर ती सर्वसाधारणपणे सर्वाना देता येईल किंवा फक्त कोरोनाग्रस्त असलेल्या दिली जाईल. या सर्व पंतप्रधान मोदी बाबींवर बोलत आहेत.