मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्यावक सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, असे म्हणत पंतप्रधाना मोदींनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा. ‘